कतारने केली 23 भारतीय कैद्यांची सुटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कतारला भेट दिल्यानंतर कतारने मैत्रीचे प्रतीक म्हणून कैदेत असलेल्या 23 भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.
 
कतार दौऱ्यादरम्यान मोदींनी प्रामुख्याने कतारमधील भारतीयांचे हिताबद्दल कतारच्या नेतृत्वाशी चर्चा केली होती. रमजानच्या पवित्र महिन्याची सुरवात होण्याच्या पार्श्वभूमीवर आमीर शेख तमीम बिन हमद अल-थाणी यांनी हे पाऊल उचलल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत. मोदी ट्विटरवरून कतारचे आभार मानत म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्याच्या सुरवातीला कतारने 23 भारतीय कैद्यांची सुटका केली. हे एका दृढ मैत्रीचे प्रतीक असून याबद्दल मी कतारच्या आमीरचे मनापासून आभार मानतो.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कतारच्या आमीरने मोदींना कतारमधील 6.3 लाख भारतीयांची काळजी घेतली जाइल असे आश्वासनही दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *