वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा

वाढदिवसाच्या पार्टीचे बिल भरण्यावरून वाशीत मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा घातला. या वादातून मद्यधुंद तरुणींच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना वाशीत घडली आहे. या मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांनादेखील मारहाण केली. यानुसार ५ तरुणी आणि त्यांचा १ मित्र अशा ६ जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

वाशीतील इनॉर्बिट मॉलच्या बेसमेंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या ठिकाणी काही तरुणींमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर प्रकार उघडकीस आला.

खारघरमधील एक तरुणी मित्र व मैत्रिणीसोबत मॉलमधील पबमध्ये जन्मदिनाची पार्टी साजरी करण्यासाठी आली होती. त्या ठिकाणी या सर्वांनी मद्यपान केल्यानंतर रात्री १ च्या सुमारास त्याच ठिकाणी असलेल्या दुसऱ्या ग्रुपमधील एका मुलीने तिला टोमणा मारला. यावरुन दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.

याच वादातून मॉलच्या बेसमेंटमध्ये त्यांच्यात हाणामारी झाली. अखेर काही प्रत्यक्षदर्शींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या सर्व मुली मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. याचा राग आल्यामुळे सदर तरुणींनी पोलीस ठाण्यातच महिला पोलिसांना मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *