खडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार ?

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. खडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार याबद्दलची उत्सुकताही शिगेला पोहचलीय.

सध्या या खात्यासाठी ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगवली जात आहे. या विस्ताराबरोबर खातेबदलही होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळणार का याकडे मित्र पक्षांचा लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *