आमिरच्या पत्नीची पोलिसांमध्ये तक्रार

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची पत्नी आणि दिग्दर्शक किरण राव हिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याचे कळते. कुणीतरी अज्ञात व्यक्ती तिच्या नावाने फेसबुकवरून चॅटिंग करत असल्याचे समोर आल्याने किरणने ही तक्रार दाखल केली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात किरणने शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केलीयं. या व्यक्तीने किरणच्या नावाचे खोटे फेसबुक अकाउन्ट बनवून त्यावर तिचा प्रोफाइल फोटो लावला आहे. इतकेच नाही तर ही व्यक्ती किरणचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींशीही तिच्या नावाने चॅट करते. तिच्या काही मैत्रिणींकडून ही बाब कळताच किरणने सर्वात आधी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यास दुजोरा दिला असून याविषयी अधिक माहिती देणे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *