जंगलात सोडलेला मुलगा 7 दिवसांनी सापडला

खोड्या करणाऱ्या आपल्या मुलाला शिक्षा म्हणून जंगलात सोडून दिल्याने हरवलेल्या मुलाचा तब्बल सहा दिवसानंतर शोध लागला आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे जगभरात पालकत्वाच्या शिस्तीचा विषय चर्चेत आला आहे.

यामातो तानुका नावाचा सात वर्षीय मुलगा दुसऱ्यांच्या गाड्यांवर आणि लोकांच्या दिशेने दगड फेकत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या त्याच्या पालकांनी त्याला गाडीतून अस्वलांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जवळच्या जंगलात एकटे सोडले. शिक्षा म्हणून काही वेळ जंगलात सोडून दिलेल्या मुलाला नेण्यासाठी त्याचे पालक काही वेळाने त्याच ठिकाणी आले. मात्र यामातो सापडला नाही. त्यानंतर आई-वडिलांनी तक्रार केल्याने मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये तब्बल सात दिवसांनी सैन्याच्या पथकाला यामातो जिवंत अवस्थेत सापडला. त्याला कोणतीही इजा झालेली नव्हती.

त्यानंतर यामातोला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून शरीराच्या काही भागावर किरकोळ खरचटले आहे. मात्र तो सुखरूप असून असून त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेमुळे पाल्यांना दबावाखाली किंवा दडपणात ठेवणे, त्यांना कुटुंबाची मालमत्ता समजणे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बाधा आणणे हे सर्व विषय पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहेत. जपानमध्ये पालकत्वाची शिस्त हा विषय नेहमीच चर्चेत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *