महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसणार आहे. पेट्रोल २.५८ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलच्या किंमतीत २.२६ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. तर हवाई इंधनाच्या किंमतीत ९.२ टक्के तर विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत २१ रुपयांनी वाढ झाली आहे.
गेल्या महिनाभरातील ही पेट्रोलची दुसरी दरवाढ आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल ३९ रुपयांची वाढ झाली आहे. तर सलग चौथ्या महिन्यात हवाई इंधनाच्या दरात वाढ झाली.
दिल्लीत हवाई इंधनाचे दर प्रति किलोलिटर ३९४५.४७ रुपयांनी वाढून ४६७२९.४८ रुपये झाले आहेत. तर विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर २१ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे दिल्लीतील गॅस सिलिंडरची किंमत ५२७.५० रुपये झाली आहे. यापूर्वी विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ४१९.१८ रुपये होती.