चमत्कार! डोंबिवली स्फोटात २ चिमुरड्यांचे प्राण वाचले.

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात, याचा प्रत्यत डोंबिवलीतील पाटील कुटुंबियांना आला.

डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटांनंतर एक १२ दिवसांचे तर दुसरीकडे २ महिन्यांच्या बाळाचे प्राण वाचले.  MIDC मधल्या पारसधाम इमारतीमध्ये राहणाऱ्या अवनी पाटील या दोन महिन्यांच्या मुलीच्या अंगावर स्फोटाच्या धक्क्यानं गॅलरीची भिंत कोसळली, पण त्यातून ती सुखरूप बचावली आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की काही दिवसांपूर्वीच अवनीची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. नाजूक हृदय असतानाही तिने हा धक्का पचवलाय हे विशेष. याच इमारतीमध्ये अवघ्या 12 दिवसांच्या दुसऱ्या चिमुरडीच्या हातात आणि कानात काचा घुसल्या. ही मुलगी पण अत्यंत सुखरूप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *