कोकणकन्येला मिळाली 48.25 लाखांची जॅग्वार

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासाठी नवीन जॅग्वार एक्सई ही लक्झरी कार विकत घेण्यात आली आहे. या गाडीची किंमत तब्बल 48.25 लाख रुपये आहे. अशी महागडी कार वापरण्यावर विरोधी पक्षानं मात्र आक्षेप घेतले आहेत, तसंच या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचाही सल्ला काँग्रेसनं दिला आहे.

देशातला एक तृतियांश भाग दुष्काळात होरपळत असताना, एवढी महागडी कार वापरावी का नाही याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी स्वत: घ्यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी दिली आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही कार विकत घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण लोकसभेच्या सचिवांनी दिलं आहे. लोकसभा अध्यक्षांसाठी चार ते पाच कार सुचवण्यात आल्या होत्या, त्यापैकी हीच कार परवडणारी असल्याचंही सचिव डी. भल्ला म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *