सास-याने घेतला सुनेचा जीव

सास-याने घेतला सुनेचा जीव

जेवण न दिल्याने संतापलेल्या सास-याने सुनेची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी हरी सिंह (वय ७८) याला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबूलीही दिली आहे.

दिल्लीतील सुलतानपुरी येथे तेजपाल सिंह, त्याची पत्नी निर्मला, मुलं व वडिल हरी सिंह यांच्यासह राहतो. तेजपाल हा न्हावी असून घराजवळच त्याचे दुकान आहे. सोमवारी रात्री तेजपालची पत्नी निर्मला (वय ४५) यांनी सासरे हरी सिंह यांना जेवण दिले नाही. यामुळे हरी सिंह चांगलेच संतापले. रात्री सर्व जण गच्चीवर झोपले असताना हरी सिंह यांनी सून निर्मलावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निर्मला यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच निर्मला यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हरी सिंह यांना ताब्यात चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. सुनेने गेल्या चार दिवसांपासून जेवण न दिल्याने राग आला व रागाच्या भरात हे कृत्य घडले अशी कबुली हरी सिंह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *