व्याधीवर मात करीत हिमतीच्या जोरवर तिने मिळवले 96.8 टक्के!

व्याधीवर मात करीत हिमतीच्या जोरवर तिने मिळवले 96.8 टक्के!

नागपूरमध्ये व्याधीवर मात करत देवयानी धोंड या विद्यार्थींनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. कायम पाठिचा कणा दुखत असतानाही देवयानीला 96.8 गुण मिळाले आहेत.

व्याधीवर मात करीत हिमतीच्या जोरवर तिने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 96.8 टक्के गुण मिळविले आहे. लहानपणापासून व्याधीनं जर्जर झालेल्या देवयानीचा चेहरा त्यामुळे उजळून निघाला आहे.

जी स्वतःच्या बळावर शाळेतही पोहचू शकत नव्हती, त्या देवयानीनं दहावीत 96.8 टक्के गुण कमावले. देवयानीचा हा आजार साधासूधा नाही. या व्याधीला ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्ट असं नाव आहे. ज्यात हाडं ठिसूळ बनतात. छोट्या उंचीवरुनही पडलो तर हाडं फॅक्चर होतात. त्यात जानेवारीत पाठिच्या कण्याचं दुखणं आलं. यावेळी अभ्यास सोडाच पण एका जागेवर बसणंही अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र देवयानी त्यालाही बधली नाही.

या यशात तिच्या पालकाचांही मोठा वाटा आहे. तिला शाळेत नेण्यापासून आणण्यापर्यंत सारी कामं कुटुंबियांनी बिनचूक केली. कागदाला अभिमान चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं, असं म्हणतात. पण, देवयानीच्या  चिकाटीला कुठंलही सर्फिफिकेट पावती देऊ शकत नाही. हे ही तेवढंच खरं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *