सोने ३७० रुपयांनी घसरले

सोने ३७० रुपयांनी घसरले

सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोने ३७0 रुपयांनी घसरून २९,२00 रुपये तोळा झाले. हा सोन्याचा सहा आठवड्यांचा नीचांक ठरला. चांदी ५0 रुपयांनी घसरून ३९,४५0 रुपये किलो झाली आहे.

जागतिक बाजारांपैकी प्रमुख बाजार असलेल्या न्यूयॉर्कमध्ये सोने २१.३८ डॉलरनी अथवा १.७१ टक्क्यांनी घसरून १,२२६.९0 डॉलर प्रति औंस झाले.

या घसरणीचा परिणाम स्थानिक बाजारावर दिसून आला. त्यातच ज्वेलर्सनी खरेदीत हात आखडता घेतला. या दुहेरी फटक्यामुळे सोने उतरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *