नोक-या देण्यात स्टार्ट अप कंपन्यांचा हात आखडता

नोक-यांसाठी गाजावाजा करुन सुरू करण्यात आलेल्या स्टार्ट अप्समध्ये आता व्यवसाय थंडावला आहे, हे स्पष्ट झाले आहे. स्टार्ट अप्सचा आता नोक-या देण्यातील उत्साह चांगलाच ओसरला असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्याथ्यरंच्या नोकरीसाठीच्या तारखा पुढे ढकलल्याबद्दल संस्थेने फ्लिपकार्टला पाठवलेल्या खरमरीत पत्रावरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

स्टार्ट अप्समध्ये नोक-यांसाठी एकेकाळी जोरदार मागणी होती. आता बहुतेक स्टार्ट अप्सनी नोकरीचे प्रस्ताव परत घेतले आहेत अथवा पगार अत्यंत कमी देऊ केले आहेत. नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात महाविद्यालयांतील कॅम्पसमध्ये नोक-यांच्या हंगामात झालेली वाढ पाहून हा नवा व्यवसाय उदयाला येत असल्याबद्दल खात्री वाटत होती. परंतु आता मात्र निधीचा अभाव आणि खर्चामुळे स्टार्ट अप्सनी हात आखडता घेतला आहे.

पक्क्या व्यवसायाशिवाय स्टार्ट अप्स मोठय़ा प्रमाणावर आपल्या पैशाचा चुराडा करत असल्याचे पाहून गुंतवणूकदार सावध झाले असून स्टार्ट अप्सना आपली भूमिका ठीकठाक करण्यासाठी दबाव आणत आहेत. स्टार्ट अप्स करत असलेली भरती हे सर्वात नुकसानदायक ठरत आहे.

टॅक्सी सेवा देणारी ओला आणि सर्वाधिक बहुमोल समजली जाणारी स्नॅपडील तर यंदा शैक्षणिक वर्षी कॅम्पसमध्ये उपस्थितच नव्हते. काही महिन्यापूर्वीच आघाडीच्या स्टार्ट अप कंपन्या अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या बरोबरीने कॅम्पसमध्ये हजर राहून गुगलसारख्या कंपनीवर मात करुन सर्वोच्च बुद्धीमान तरुणांची निवड करण्यासाठी जमल्या होत्या.

हैदराबादेतील इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्रमुख टीव्ही देवीप्रसाद म्हणाले की, स्टार्ट अप कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड आहे, परंतु काही कंपन्यांनी आपला शब्द पाळला नाही. स्विग्गी या स्टार्ट अप कंपनीने कॅम्पस मुलाखतींतून ऐनवेळी माघार घेतली. दिल्लीच्या आयआयटीमध्ये दोन स्टार्ट अप कंपन्या बंद झाल्यावर त्यांनी दिलेले नोकरीचे प्रस्ताव मागे घेतले. अन्य दोन कंपन्यांनी नोकरीचे दिलेले प्रस्ताव पाळले नाहीत.

चीनच्या अलिबाबाची गुंतवणूक असलेली पेटीएम ही स्टार्ट अप कंपनी मात्र सणसणीत अपवाद ठरली आहे. भारतातील सर्व पहिल्या स्तरातील कॅम्पसमधून आम्ही उमेदवार निवडले आहेत, असे कंपनीचे उपाध्यक्ष अमित सिन्हा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *