रोड रोमियो गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

रोड रोमियो आणि गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून एका शाळकरी मुलीनं आत्महत्या केली. तर नराधमाच्या अतिप्रसंगाला विरोध करताना गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षीय मुलीला उजव्या हाताची दोन बोटं गमावावी लागलीत.

या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात घेण्याची सूचना राज्य महिला आयोगाने दिली आहे. त्याचबरोबर यासारख्या प्रकरणात पोलिसांनी जास्त संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचंही महिला आयोगानं म्हटलंय.

दरम्यान, एकीकडे राज्य महिला आयोग कठोर पावलं उचलण्याची भाषा करत असताना, दुसरीकडे या दोन घटनातून नागपूर जिल्ह्यातील रोडरोमियो आणि गुंडांचे धाडस किती वाढले आहे हे स्पष्ट होते. म्हणूनच आता महिला आयोगाने या संबंधी निर्णय घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *