स्वप्निल जोशीला कन्यारत्नाची प्राप्ती

मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्निल जोशी सध्या आठव्या आसमानात आहे. स्वप्नील व त्याची पत्नी लीना या दोघांच्याही आयुष्यात एक ‘नन्ही परी’ आली आहे. लीनाने सोमवारी रात्री एका गोंडस मुलीला जन्म दिला असून जोशी कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

स्वप्नीलसाठी हे वर्ष खूपच खास आहे. संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनच्या ‘लाल इश्क’ चित्रपटात त्याची मुख्य भूमिका असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्वाचा असून, चित्रपट प्रदर्शनापूर्वीच काही दिवस त्याला ‘कन्या’रत्नाची प्राप्ती झाल्याने तो डबल खुश आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच त्याला सेलिब्रेशनसाठी आणखी एक चांगली संधी मिळाली आहे. स्वप्निल व लीनाला आमच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *