मेंदीची नजाकत

मेंदीची नजाकत

अगदी लहान मुलीपासून ते अगदी मोठय़ांपर्यंत प्रत्येक महिलेला या मेंदी भुरळ पडल्याशिवाय राहात नाहीत. आता तर पुरुषही मोठय़ा हौसेने आपल्या लग्नात मेंदी काढतात. इतकी ती मेंदी सगळ्यांना पार वेड लावते. त्यात सध्या तर लग्नसराईचा सीझन आहे. लग्नसराई म्हटली की मेंदी ही आलीच.

तिचा रंग, तिची ती नाजूक नक्षी यामुळे हाताचं सौंदर्य खुललंच म्हणून समजा. म्हणूनच लग्नासाठी जमलेली प्रत्येक महिला ही मेंदी काढून घेते. आजकाल नेहमीची नाजूक भरलेल्या मेंदी नक्षी जाऊन कित्येक विविध प्रकाराने मेंदी काढलेली दिसून येते. यात अगदी गणपती, शंकर-पार्वती याबरोबरच वेलबुट्टी देखील काढली जाते.

ही वेलबुट्टी म्हणजे साधीसुधी नाही तर अगदी एखादं ब्रेसलेट हातावर घातलं तर ते कसं दिसेल अशा पद्धतीने ही मेंदी काढण्यात येते. त्याचबरोबर नेहमीची हात भरण्याची पद्धत बाजूला सारून केवळ हाताच्या कोप-यांमध्येही नक्षी काढली जाते. अशा या आगळ्यावेगळ्या डिझाईन खास आमच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत. या नक्षी तुमच्या हातावर काढल्या तर त्या समारंभात तुमच्या मेंदीचं कौतुक झाल्याशिवाय राहाणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *