इंदगाव आश्रमात झालेल्या राड्याप्रकरणी आठ दिवसांपासून फरार असलेले नगरसेवक आशीष दामले यांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातील औसर येथून मंगळवारी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून १२ बोअरची बंदूक आणि पाच काडतुसे जप्त केली.
बदलापूर येथील इंदगाव साधना भवन आश्रमातून तरुणीचे अपहरण, दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर दामले यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दहाजणांना ताब्यात घेतले होते. आठ दिवसांपासून पोलिसांना तुरी देणाऱ्या दामले यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण सेशन्स कोर्टात अर्ज केला. मात्र, तो कोर्टाने फेटाळला. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी दामले यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. भोपाळ, इंदोर, देवास अशा विविध ठिकाणी दामले लपून बसले होते. अखेर इंदोर, औसर येथील एका हॉटेलात ते राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन त्यांना अटक केली
