भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना रविवारी बांगलादेशने ‘लिबरेशन ऑफ वॉर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात वाजपेयी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.
वाजपेयी हे प्रकृती अस्वास्थामुळे बांगलादेशला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे हा पुरस्कार सुपूर्द केला. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, नामवंत नागरिक, राजदूत उपस्थित होते.
वाजपेयी हे दिग्गज नेते असून त्यांना आपल्यासहित लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. वाजपेयी यांचा सन्मान होणे हा भारतीयांचा सन्मान आहे. त्यांचे आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी वाजपेयी यांचा गौरव केला.
बांगलादेश मुक्ती संग्रामाला वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. तसेच त्यासाठी त्यांनी सत्याग्रहही केला होता. त्यात आपणही सहभागी झालो होतो, असे मोदी यांनी सांगितले.

