देशात संगणकीय क्रांती करणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नवी दिल्ली येथील वीरभूमी या त्यांच्या समाधीस्थळी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपति हामिद अंसारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी आदरांजली वाहिली.
२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरांम्बुदूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या एका सभेत राजीव गांधी यांची बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती.‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम’ (एलटीटीई) या संघटनेने ही हत्या घडवून आणली होती.

