अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणा-या व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणा-या अज्ञात व्यक्तीला थोपवण्यासाठी गोळीबार करण्यात आला असून त्यात ती व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेनंतरर व्हाइट हाऊस तातडीनं बंद करून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाइट हाऊसच्या मुख्य भवनाजवळील चेकपोस्टवर एक सशस्त्र व्यक्ती उभे असल्याचे दिसत होते. अधिक-यांनी त्याला थांबण्याची सूचना केल्यानंतरही तो व्हाइट हाऊसच्या दिशेने पुढे सरकू लागल्यानंतर सुरक्षा अधिका-यांनी त्याला रोखण्यासाठई गोळीबार केला, ज्यामध्ये ती व्यक्ती जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान या घटनेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुदैवाने व्हाइट हाऊसमध्ये नव्हते. काही काळानंतर व्हाइट हाऊसचा कारभार पु्न्हा नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आला.
गोळीबारा जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.

