…. जगण्यासाठी ‘ती’ गेली 12 वर्ष खात्ये माती!

…. जगण्यासाठी ‘ती’ गेली 12 वर्ष खात्ये माती!

जगण्यासाठी माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. वस्त्र आणि निवा-याची सोय असेल मात्र अन्नच नसेल तर…? एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस दिवसभर झटत असतो, काबाडकष्ट करत असतो. उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यामधील रजवाडा गावात मात्र एक आदिवासी महिला गेली 12 वर्ष माती खाऊन जगत आहे. शकुन रायकवार असं या महिलेचं नाव आहे. सध्या त्यांचं वय 45 वर्ष आहे.
बुंदेलखंडमधील या जिल्ह्यात उपासमारी आणि कर्जामुळे शेतकरी अगोदरच आत्महत्या करत आहे. सरकारने अनेक आश्वासने दिली आहेत, मात्र येथील परिस्थिती बदलली नसून गंभीर होत चालली आहे. रजवाडा गावात अगोदरच दुष्काळामुळे शेतं कोरडी पडली असताना लोकांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. दोन वेळचं जेवायला मिळावं यासाठी अनेक लोक भीक मागतात तर काही जण माती खाऊन आपल्या पोटाला आधार देत आहेत.
शकुन रायकवार याच गावाची रहिवासी असून जेव्हा तिला जेवायला काहीच मिळत नाही तेव्हा ती माती खाते. आणि एक दोन नाही तर तब्बल गेली 12 वर्ष त्या माती खात आहेत. माती खाऊन त्यांच्या पोटात दगड तयार झाले आहेत. इतकी वर्ष माती, दगड खाऊनदेखील त्या अजून आश्चर्यकारकरित्या जिवंत आहेत. सहारिया समुदायातील 60 टक्के लोकांनी ललितपूरमधून स्थलांतर केलं आहे. अनेक गावांना वाळवंटाचं स्वरुप आलं आहे. अनेकांनी घराला टाळे ठोकले आहेत. जे मागे राहिले आहेत त्यांच्या जगण्याची काहीच सोय नाही.
शकुन रायकवारला जेव्हा तिच्या माती खाण्याबद्दल विचारलं तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. पतीच्या मृत्यूनंतर सगळच उघड्यावर आलं. दोन मुलं होती पण तीदेखील सोडून गेली. रेशन कार्डपण नाही आहे, लोक जेवायला अन्न देतात पण दुष्काळात तेदेखील कुठपर्यंत मदत करणार. जेव्हा लोकांनी साथ सोडली तेव्हा जमीनीने साथ दिली असं शकुन रायकवार सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *