वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग

वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग लागल्याने जवळपास १० घरांमधील सामान जळून खाक झालं आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास या शंभर वर्षे जून्या मधूसुदन सोसायटीत आग लागली होती. गुलशन नट यांच्या घरातील सिलिंडर स्फोटामुळे आग भडकली. यानंतर एकामागोमाग तब्बल ५ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी वाढली होती. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासंच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर  नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नागरिकांनी वेळीच पळ काढल्यामुळे जिवितहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *