मोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार

पतीने मोबाईल तपासल्याने रागाच्या भरात पत्नीने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केल्याची खळबळजनक घटना बंगळूरमध्ये घडली आहे.
 
बंगळूरमधील कईकोनडनाहल्ली भागात ही घटना घडली असून, या भागात आयटीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पतीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. त्याने पत्नीपासून बचावासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. सुनीता सिंह आणि चंद्रप्रकाश सिंह असे या जोडप्याचे नाव असून, ते मुळचे बिहारमधील आहेत. ते दोघेही आयटी कंपनीत नोकरीस होते, सुनीताने नुकतीच नोकरी सोडली असून, ती घरी असते.
 
चंद्रप्रकाश यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुनीताला मोबाईलमध्ये व्यस्त राहण्याचे प्रचंड वेड आहे. चार मे च्या रात्री कामावरून घरी परतल्यानंतर सुनीताकडे जेवण देण्याची मागणी केल्यानंतर ती मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये खूप शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे मी तिचा मोबाईल तपासण्यासाठी घेतला. तिने रागाच्या भरात चाकूने माझ्या बोटांवर वार केले. 
 
चंद्रप्रकाश यांच्या तक्रारीनंतर सुनीता यांनीही त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी या दोघांनाही बोलावून समज दिली आहे. तसेच पोलिसांनी काही दिवस या दोघांवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *