पेट्रोल आणि डिझेलमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. नवीन दरानुसार पेट्रोल प्रति लिटर 83 पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर 1 रुपया 26 पैशांनी वाढल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितले. ही वाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 63.02 रुपये, तर डिझेलाचा दर 51.67 रुपये झाला आहे. या पूर्वी कंपनीने एक मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती.