पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘मन की बात‘ हा रेडिओवरून जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम 22 मे (रविवार) रोजी होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज (मंगळवार) आपण येत्या रविवारी मन की बात करणार असल्याचे स्पष्ट केले.‘मन की बात‘मध्ये मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत, ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
पंतप्रधान दर महिन्यात रविवारी ‘मन की बात‘ या कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती देतात. तसेच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांनाही प्राधान्य देतात. केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती या कार्यक्रमातून दिली आहे.