छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील गंगलूर भागातील जंगलात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. आज पहाटे तीनच्या सुमारास नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला. सीआरपीएफच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. परिसरात शोधमोहिम सुरु आहे.
नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव सतीन गौर असे आहे. तो मुळचा आंध्र प्रदेशातील आहे. नक्षलविरोधी कारवायांसाठी बनविण्यात आलेल्या 85 बटालियनमध्ये तो कार्यरत होता