उमा भारतींच्या निवासस्थानी जवानाची आत्महत्या

केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास मंत्री उमा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या जवानाने रविवारी मध्यरात्री गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
 
दिल्लीतील अकबर रस्त्यावर उमा भारती यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल बृजपाल हे सेवेस होते. त्यांनी रविवारी मध्यरात्री आपल्या जवळील सर्व्हिस बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. 
 
बृजपाल यांनी हे कृत्य का केले, याचा शोध घेण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांतील सुरक्षा विभागात बृजपाल कार्यरत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *