नागपुरात पारा 45.7 अंशांवर

विदर्भात उन्हाची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून, तापमानाने नागपुरात आणखी एक उच्चांक गाठला आहे. रविवारी राज्याच्या उपराजधानीतील कमाल तापमान 45.7 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे या मोसमातील विक्रमी ठरले. विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.

विदर्भात मे महिना सर्वाधिक तापमानाचा मानला जातो; परंतु अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा कहर झपाट्याने वाढतो आहे. विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या उष्णलाटेखाली आहेत. नागपुरातही उन्हाचा जबर तडाखा जाणवत आहे. शनिवारी मोसमातील (45.6 अंश सेल्सिअस) उच्चांक नोंदविल्यानंतर रविवारी 45.7 अंश सेल्सिअस या आणखी एका विक्रमाची नोंद झाली. उन्हाची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *