‘नीट’ परिक्षेच्या घोळावर विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.
‘नीट’ परीक्षा कधीपासून लागू करायची यासंदर्भातला निर्णय पालक आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले. देश नेमकं कोर्ट चालवतंय की सरकार असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधानांसोबत बैठकीची वेळ मिळणार असल्याची माहिती राज यांनी या भेटीनंतर दिली.
राज ठाकरे यांनी नीटच्या मुद्द्यासोबतच राज्यातल्या भीषण दुष्काळाबाबतही मुख्यमंत्र्यांशी बातचित केली.
दरम्यान मुख्यमंत्री आज 12 वाजता नीटच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.

