बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचं अध्यक्षपद राखायचं की आयसीसीचं चेअरमनपद? या यक्षप्रश्नामुळे त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आहे.
मनोहर यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शरद पवार आणि अजय शिर्के यांची नावं बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
मनोहर हे सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन अशी दुहेरी भूमिका बजावत होते. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड ही मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे.
आयसीसीच्या नव्या नियमांनुसार चेअरमन पदावरच्या व्यक्तीला राष्ट्रीय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये दुसरं पद भूषवता येणार नाही. त्यामुळे आयसीसीच्या चेअरमनदावर पुन्हा निवडून यायचं, तर शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.
अखेर मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

