टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात दोघे ठार

सोलापूर येथील बोरामणी नाक्यावर आयशर टेम्पो व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील दोघे जण जागीच ठार झाले. तर दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली़ जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमद शेख (२५) व आण्णा जावीर (३०) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत़ तर महानंदा मुळे (३०) तर प्रथमेश मुळे (११) ही दोघे मायलेकरे जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो मिरची घेऊन सोलापूर येथील बाजार समितीत येत होता़.

त्याच वेळी दयानंद महाविद्यालयाकडून येणारी कंटेनर ट्रक अक्कलकोट पाण्याच्या टाकीकडे जात होता़ ही दोन्हीही वाहनं जुना बोरामणी चौकात वेगाने जात असताना दोघांची समोरासमोर धडक झाली़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *