उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिताय.. ?

उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिताय.. ?

बारा महिनेही कोल्ड्रिंक पिणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यात आता उन्हाळा म्हंटल्यावर घशाला तरतरी येण्यासाठी आणि काहीतरी थंड प्यायचं म्हणूनही कोल्ड्रिंक पिणारे भरपूर आहेत. परंतु हे कोल्ड्रिंक पिण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात यांची यादीही भलीमोठी होईल.
एक कोल्ड्रिंकची बाटली अवघ्या दहा मिनिटात आपल्या शरीरातील साखरेची मात्रा ग्रहन करून घेतात. त्यामुळे आपण दिवसभर जेवढी साखरेची मात्रा उपभोगतो ती अवघ्या दहा मिनिटात ग्रहन केली जाते. याने मग शरीरातील साखरेचा स्तर अनावश्‍यकपणे वाढतो. कॅफिन आढळणारे कोल्ड्रिंक प्यायल्याने शरीरातील रक्‍तातील साखरेची पातळी वाढून ते इन्शुलिनसह अतिशय वेगाने वर येते. कोल्ड्रिंकमधून शरीरात जाणारी साखर यकृत हे चरबी म्हणून साठवून घेते. त्यामुळे आपले वजन जलद गतीने वाढून मधुमेह, ह्रदयरोग असे आजार मागे लागू शकतात. कोल्ड्रिंक पिल्यानंतर अवघ्या 40 मिनीटात ते संपूर्ण शरीराकडून शोषले जाते आणि 45 मिनिटानंतर ते डोपेमाईनची निर्मिती करू लागते जे आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम करू शकते. तेव्हा या कोल्ड्रिंक पिण्याचे आपल्या आरोग्यावर कसे विपरीत परिणाम होऊ शकतात याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *