पुन्हा एकदा युवराजने मैदानावरच घेतले क्रिकेटच्या देवाचे दर्शन

पुन्हा एकदा युवराजने मैदानावरच घेतले क्रिकेटच्या देवाचे दर्शन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. सचिनवर त्यांची जीवापड श्रद्धा असते. भारतीय संघातले त्याचे सहकारीही सचिनचा खूप आदर करतात. असाच एक सचिनचा चाहता म्हणून धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग ओळखला जातो. युवराज सचिनला आपला आदर्श मानतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यातही त्याचा प्रत्यय आला. हैदराबाद आणि मुंबई संघातील सामन्यात हैदराबादने मुंबईचा पराभव केला. पण सामना संपल्यानंतर युवराजने मुंबई इंडियन्सचा मेंटॉर असलेल्या सचिनकडे धाव घेत त्याच्या पाया पडला.

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स दरम्यान रंगलेल्या सामन्यात युवराजने 39 धावा फटकावल्या. आयपीएलच्या या सत्रात युवराजची ही दुसरी मॅच होती आणि गेल्या सामन्याच्या तुलनेत कालच्या सामन्यात त्याने खूपच चांगली कामगिरी केली. आपली चांगली खेळी आणि संघानेही सामना जिंकल्याच्या दुहेरी आनंदात असलेल्या युवराजला आपल्या आदर्शचा मात्र विसर पडला नाही हे विशेष. इतर खेळाडूंसोबत जल्लोष करत मैदानावर आलेल्या युवराजने ग्राऊंडवर उपस्थित असलेल्या सचिनकडे धाव घेत त्याचे आशिर्वाद घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *