फ्रिझशिवाय घरातील फळे ताजी-तवानी राहू शकत नाहीत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे ठरेल. कारण, एका खास मिश्रणात ही फळे बुडवल्यानंतर ती एक-दोन नव्हे तर आठवडाभरही ताजी राहू शकतात.
एका नव्या संशोधनानुसार सिल्कच्या वास नसलेल्या पातळ मिश्रणात एक खास गुण असतो. सिल्कमध्ये आढळून येणार्या फिब्रोईन प्रोटीनमध्ये दुसर्या पदार्थांना सुरक्षित ठेवण्याची क्षमता असते. हे प्रोटीन सहजपणे विरघळतो तसेच तो जैविक रूपानेही पूर्णपणे सुरक्षित आहे.
संशोधनावेळी नुकतीच तोडली गेलेली ताजी फळे सिल्क फिब्रोईनच्या मिश्रणात बुडवून खोलीत सामान्य तापमानात ठेवण्यात आली. त्यानंतर असे आढळून आली की जी फळे सिल्क फिब्रोईनमध्ये बुडवण्यात आली होती ती फळे अन्य फळांच्या तुलनेत जास्त काळ ताजी होती.
मॅसॅच्युसेट्समधील ट्रफ्टस युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर आणि संशोधक फियोरेंजो आमनेटो यांनी सांगितले की, सिल्क फिब्रोईनवरील संशोधनाला चांगले यश मिळाले आहे. ही प्रक्रिया फळ लागवड क्षेत्रात उपयुक्त पडू शकते. मात्र, यावर आणखी सविस्तर संशोधन होणे आवश्यक आहे. हे संशोधन व्यापकपणे वापरात आल्यास फ्रिझवर होणारा खर्च तर टळेलच शिवाय विजेचीही बचत होण्यास मदत मिळेल, हे निश्चित.