लंडनमध्ये पहिल्यांदाच एक मुस्लिम नागरिक महापौरपदी निवडून आले आहेत. लंडनमधील महापौर पदाच्या निवडणुकीत मजूर पक्षाचे सादिक खान यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत पाकिस्तानी वंशाचे असलेले खान यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार जॅक गोल्डस्मिथ यांचा पराभव केला.
या निवडणुकीत हिंदू आणि शीख नागरिकांची मते मिळविण्यासाठी जॅक गोल्डस्मिथ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर केला होता. सादिक खान यांना न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. सादिक खान यांनी मानव अधिकार कार्यकर्ते म्हणून कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यानंतर ते २००५ पासून लेबर पक्षाचे खासदार झाले होते.
माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते. कॅबिनेट बैठकीतील ते पहिले मुस्लिम मंत्री होते.
सॉलिसिटर सादीया अहमदबरोबर त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुली आहेत. १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतर सादीक खान यांचे आजी-आजोबा भारतातून पाकिस्तानात गेले. सादीक खान यांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले होते.

