दरवाजाची घंटी वाजली म्हणून तुम्ही दरवाजा उघडलात आणि समोर मगर मागच्या दोन पायांवर उभी असलेली पाहून तुमची काय अवस्था होईल? हे असे काही हॉलिवूडच्या हॉरर चित्रपटात घडू शकते, असे तुम्ही म्हणाल; पण असे प्रत्यक्षातही घडू शकते, नव्हे घडले आहे. फक्त दरवाजा उघडायला त्यावेळी घरात कुणी नव्हतं. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनातील एका घरात हा प्रकार घडला. एका मगरीने एका घराच्या दारावरची बेल वाजवली; पण दरवाजा कुणी उघडला नाही. कारण, घरात कुणी नव्हतं; पण शेजारच्यांनी या मगरीला बघितलं आणि लगेच तिला मोबाईलमध्ये कैद केले. या घराची मालकीण जेमी हिला शेजार्याने जेव्हा या मगरीबद्दल सांगितले, तेव्हा तिचा त्यावर विश्वास बसला नाही; पण त्याने मोबाईलवर शूट केलेला व्हिडीओच दाखवला तेव्हा ती चाटच पडली.
मगरीने वाजवली दारावरची घंटी
