चोरी होत नसल्याची ख्याती असलेल्या शनिशिंगणापुरावर गुंडांची वक्रदृष्टी

चोरी होत नसल्याची ख्याती असलेल्या शनिशिंगणापुरावर गुंडांची वक्रदृष्टी

साडेसाती टाळणारा अशी श्रीक्षेत्र शनिशिंगणापुराची ख्याती आहे. इथल्या घरांना दरवाजे नसल्याचं आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. शिंगणापुरात चोरी होत नसल्याचा भाविकांचा समजही आहे, मात्र आता याच शनिदेवाच्या साडेसातीला सुरुवात झाली आहे. शनिदेवावर चक्क गुंडांची वक्रदृष्टी पडली आहे.

भरचौकात गुंड पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करत आहेत, हातात बंदुका असूनही पोलीस हतबल आहेत. अशी दृश्यं सध्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरमध्ये पाहायला मिळत आहेत. जून 2014 पासून सुरु झालेली गुंडांची दहशत आजही थांबण्याचं नाव घेत नाही. आता शनि देवस्थानच्या कार्यकारी अध्यक्षांनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या दहतशतीमागचं नाव गणेश भूतकर. पोलिसांच्या लेखी हा तडीपार गुंड, मात्र शनिशिंगणापूरमध्ये आजही तो राजरोसपणे फिरत आहे. नुकतीच शनिच्या पूजेवेळीही त्याने सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. गणेश भूतकरच्या या दहशतीमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.

राजकीय पाठबळ असल्यानेच गणेश भूतकरची मुजोरी वाढल्याचा आरोप देवस्थानने केला आहे. याशिवाय गणेश भूतकरला मोक्का लावण्याची मागणीदेखील त्यांनी केली. मात्र ही साडेसाती कधी थांबणार हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *