मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन मंगळवारी गौरवण्यात आले. ‘रिंगण’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर ‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकी राजगुरू हिला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार ‘कटयार काळजात घुसली’साठी गायक महेश काळेला प्रदान करण्यात आला.

६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. मनोज कुमार यांना स्वर्णकमळ, दहा लाख रुपये व शाल देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून सुवर्णकमळ देऊन ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला. अडीच लाख रुपये, स्वर्णकमळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

»  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी),

»  सर्वोत्कृष्ट अभिनेता अमिताभ बच्चन (पिकू),

»  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना रनौत (टनू वेडस् मन्नू रिटर्न),

»  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी),

»  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : दम लगा के हैशा,

»  सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बजरंगी भाईजान,

»  सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : सुदीप चॅटर्जी (बाजीराव मस्तानी),

»  सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद : जुही चतुर्वेदी (पिकू), हिमांशू शर्मा (तन्नू वेडस् मन्नू रिटर्न रिटर्न),

»  सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट : दुरोंतो,

»  सर्वोत्कृष्ट बाल कलाकार गौरव मेनन आदींना पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *