अरे बाप रे… या चिमुकल्याला आहेत ३१ बोटं…

तुम्ही हृतिक रोशनला पाहिलं आहे की त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत.  त्यामुळे हृतिकला एकूण २१ बोटं आहेत. पण तुम्ही आतापर्यंत एखाद्या माणसाला २१ किंवा २२ बोटं असल्याचं ऐकलं असेल पण चीनमधील एक चिमुरडा आहे की त्याला एकूण ३१ बोटं आहेत.

चीनच्या शेनेन शहरात जन्मलेल्या या मुलाच्या हाताला १५ बोटं आहेत तर त्याच्या पायाची एकूण बोटं १६ आहेत.

होंगहोंग नावाच्या या  तीन महिन्याच्या मुलाला अंगठाच नाही. एका हाताला दोन तळवे आहेत.

या मुलाचे पालक त्याचा इलाजासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी डॉक्टर शोधत आहेत. त्याच्या सर्जरीसाठी खूप मोठा खर्च आहे.  विशेष म्हणजे त्याच्या आईलाही एका हाताला १२ बोटं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *