मेंदू कसा असतो?

मेंदू कसा असतो?

तुम्हाला माहिती आहे का, आपला मेंदू अतिशय मऊ, लुसलुशीत असतो, कारण तो मुख्यत्वे चरबी आणि पाण्याने बनलेला असतो. करडया रंगाचा आणि पुडिंगप्रमाणे दिसणारा मेंदू शंभर अब्ज पेशींनी बनलेला आहे. या पेशींना ‘न्यूरॉन्स’ म्हणतात. या न्यूरॉन्समुळे आपण विचार करू शकतो, शिकू शकतो, दुस-याच्या भावना समजून घेऊ शकतो. या न्यूरॉन्सना चांगल्या प्रथिनांची, चरबीची, कर्बोदाकांची, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पॉलिन्यूट्रियण्ट्स आणि पाण्याची गरज असते.

या पोषणमूल्यांमुळे न्यूरॉन्सची शिकण्याची कार्ये अधिक प्रभावी होतात. त्यामुळे मुलांना परीक्षेत चांगली कामगिरी करून दाखवायची असेल तर मेंदूतील या पेशींना उत्तम खुराक मिळाला पाहिजे आणि या पेशींना पोषक खाद्य मिळण्याकरिता मुलांनी आरोग्यदायी खाणे खाल्ले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *