आयांच्या आळशीपणामुळेच मॅगीच्या विक्रीत आणि लोकप्रियतेत वाढ झाल्याचे निरीक्षण मध्य प्रदेशातील भाजप आमदार उषा ठाकूर यांनी मांडले आहे. मॅगीवरील बंदीचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, मुलांच्या माता इतक्या आळशी का झाल्या आहेत हे समजत नाही. त्या मुलांना इन्स्टंट नूडल्स खाऊ घालतात. आमच्या काळात पराठा, हलवा, शेवया असे पदार्थ माता मुलांना देत असत. मात्र, आता तसे होताना दिसत नाही. मॅगीवर बंदी घालण्याचे पाऊल योग्य असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मॅगीसारख्या इन्स्टंट अन्नपदार्थावर बहिष्कारच घातला पाहिजे.
आळशी आयांमुळेच मॅगीच्या विक्रीत वाढ
