स्टिव्ह स्मिथ आयपीएलमधून बाहेर

स्टिव्ह स्मिथ आयपीएलमधून बाहेर

आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा सतत पराभव होत असतांना आता त्यांना आणखी एका धक्का बसला आहे.  स्टिव्ह स्मिथला हा दुखापतीमुळे संघातून बाहेर जावे लागणार आहे.

पुणे संघाचा प्रमुख फलंदाज ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आहे. मात्र त्याला झालेल्या दुखापतीमुळे स्मिथला आयपीएलचे पुढील सामने खेळता येणार नाहीत.

तो गेल्या आठवड्यापासून मनगटाच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो पुन्हा मायदेशी परतणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वैद्यकीय अधिकारी ऍलेक्स काउन्टोरिस यांनी दिली.

पुणे संघातील प्रमुख खेळाडू केवीन पीटरसन, मिशेल मार्श, फाफ डू प्लेसिस हे दुखापतीने त्रस्त आहेत. त्यात आता स्मिथही संघातून बाहेर जाणार असल्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अडचनीत वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *