सरी बरसल्या… मुंबई, पुणे, नाशिकसह, राज्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी

सरी बरसल्या… मुंबई, पुणे, नाशिकसह, राज्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी

पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि नाशिक येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी येथे कोसळत आहेत. तर मुंबई-पुणे महामार्गावरही आज पावसानं हजेरी लावली आहे.

५ तारखेला केरळ मध्ये पाउस झाला. यानंतर केरळमध्ये आकाश निरभ्र असल्याकारणानं केरळमध्ये अद्यापही म्हणावा तसा पाऊस बसरलेला नाही.

लक्षद्वीपच्या जवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यावर पाऊस जोर धरेल अशी शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान काल पावसाने सिंधुदुर्गमध्ये जोरदार हजेरी लावल्यामुळे कोकण सुखावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *