मुंबईत मध्य रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनासाठी रविवारी रात्री घेतलेला विशेष मेगाब्लॉक सोमवारी सकाळी पाच वाजून ३७ मिनिटांनी संपला. एसी परिवर्तन झाल्यानंतर सकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी सीएसटी- अंबरनाथ ही पहिली लोकल मध्य रेल्वेवरुन धावली. तर कल्याणहून सीएसटीकडे येणारी पहिली लोकल सहा वाजून चार मिनिटांनी सोडण्यात आली.
मात्र एसी परिवर्तन झाल्यानंतरही मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून अनेक लोकल गाड्या उशीराने धावत आहेत.
रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेला मॅगाब्लॉक अखेर संपला आहे. डीसी टू एसी करण्याच्या कामानंतर मध्य रेल्वेचा विद्युतप्रवाह २५ हजार डीसी वरुन २५ हजार एसी प्रवाह इतका झाला आहे. ज्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर गाड्या अधिक वेगाने धावणार आहेत.
मात्र या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. उफनगरीय गाड्या झाल्या असल्या तरी लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईहून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर मुंबई भुसावळ एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची गाडी रद्द करण्यात आली आहे.
मात्र, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या मार्गांवरील लोकल गाड्या डीसी वीजप्रवाहावर धावणार आहेत.