दक्षिण काश्मरीमधील पुलवामा जिल्ह्यात जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. 27) उशिरा घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नैना बातापोरा गावाजवळ सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर सुरक्षा दलाचे जवान व जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी संयुक्तरीत्या दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू केली. यावेळी नैना बातापोरा गावाच्या दिशेने जवान जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी जागीच ठार झाले. दहशतवाद्यांविरोधात बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.‘
दरम्यान, दहशतवाद्यांविरोधात आज सकाळपासून शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.