तृप्ती देसाईंना धक्के मारून बाहेर काढू- अबू आझमी

तृप्ती देसाईंना धक्के मारून बाहेर काढू- अबू आझमी

तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धक्के मारून बाहेर काढू, असा इशारा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यातील महिलांना असलेल्या प्रवेश बंदी विरोधात आंदोलन करण्याचे ठरविल्यानंतर गुरूवार सकाळपासूनच परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दर्गा परिसरात अबू आझमी आपल्या समर्थकांसोबत दाखल झाले असून, शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख देखील याठिकाणी पोहोचले आहेत. मंदिर प्रवेशाचा मुद्दा करत तृप्ती देसाई केवळ प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणताही आदेश येऊ दे आम्ही ऐकणार नाही. देसाईंना धक्के मारून बाहेर काढू, असा धमकी वजा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

सध्या महिलांना याठिकाणी महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाण्याची परवानगी आहे. त्या ठिकाणापर्यंत जाण्यासही तृप्ती देसाई यांना अबू आझमी यांनी आता विरोध केला आहे. दरम्यान, आम्ही शांततापूर्वक आंदोलन करणार आहोत. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही आणि अशा धार्मिक संघटनांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. याशिवाय, घटनास्थळी माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला पोलीस आणि गृहखाते जबाबदार असेल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *