चार वर्षात जयललितांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

चार वर्षात जयललितांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या संपत्तीमध्ये चार वर्षात दुप्प्ट वाढ झाली आहे. आर.के.नगरमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणा-या जयललिता यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी ११७.१३ कोटीची संपत्ती जाहीर केली आहे. चार वर्षांपूर्वी २०११ मध्ये जयललिता यांनी ५१.४० कोटीची संपत्ती जाहीर केली होती.

२०११ मध्ये जयललिता यांनी श्रीरंगममधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी त्यांनी ५१.४० कोटींची चल आणि अचल संपत्ती जाहीर केली होती. सध्याच्या प्रतिज्ञापत्रानुसार अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा असणा-या जयललिता यांच्याकडे ४५.०४ कोटीची चल तर, ७२.०९ कोटींची अचल संपत्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *