दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालाची तारीख शनिवारी दुपारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली.

दहावीचा निकाल येत्या आठ जूनला म्हणजे येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दुपारी एक वाजता संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहता येईल.

मागच्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर दहावीच्या निकालाच्या तारखेवरुन अफवांचे पीक आले होते. त्यामुळे आधीच टेन्शनमध्ये असलेले विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम, गोंधळ वाढत चालला होता.

आधी तीन जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची अफवा पसरली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील दहावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे समजले जाते. दहवीतील टक्केवारीवरुन विद्यार्थी भविष्यातील करीयरसाठी शाखेची निवड करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *