काबूलमध्ये आत्मघातकी स्फोट,२८ ठार

काबूल शहरामध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटात २८ जण मृत्यूमुखी पडले असून अन्य ३२७ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट मंगळवारी सकाळच्या सुमारास घडवून आणला.

अफगानिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा स्फोट झाला. या स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. पण अफगाण गुप्तहेर संघटनेचे कार्यालय स्फोट झालेल्या परिसरापासून जवळ असल्याचे समजते. या स्फोटाचा मोठा आवाज झाला असून परिसरात सर्वत्र काळा धुर पसरला.

सत्तेसाठी हिंसक संघर्ष करणा-या तालिबानने अफगाण सैन्याविरोधातील नव्या वार्षिक मोहिमेची घोषणा गेल्याच आठवड्यात केली आहे. या पार्श्वभूमीवर घडविण्यात आलेला हा हल्ला अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. ‘हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबानने चर्चा करावी,’ यासाठी येथील राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रयत्नशील आहे. मात्र तालिबानने हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *