परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
स्वराज यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.