नदीला लागली भीषण आग

नदीला लागली भीषण आग

आजपयर्र्ंत आपण आश्‍चर्यकारक घटना अथवा छायाचित्रांबद्दल ऐकले अथवा पाहिले असणार. मात्र, नुकतीच एक ऑस्ट्रेलियात एक घटना घडली. ते पाहून तुमचा त्यावर विश्‍वासच बसणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या क्‍विन्सलँडमधील ‘कोडमाईन’  नामक नदीला भीषण आग लागली आहे. तसे पाहिल्यास पाण्याच्या मदतीने आग विझवली जाते. मात्र, पाण्यालाच आग लागली तर? म्हणूनच ही आग विझता विझेना.   या आश्‍चर्यकारक घटनेची माहितीही जरा विचित्रच आहे. कोडमाईन नदी परिसरात शेकडोंच्या संख्येने ‘मिथेन’ गॅसच्या विहिरी आहेत. या विहिरींतून मिथेन वायू काढला जातो. गळतीमुळे पाण्यावर हा वायू तरंगत आहे. या पार्श्‍वभूमीवर विहिरींतून गॅस काढण्यास ग्रीन पार्टीकडून जोरदार विरोध होत आहे. या पक्षाचे खासदार बकिंघम यांनी नावेत बसून नदीत प्रवेश केला आणि लायटर पेटवला. क्षणार्धात नदीने पेट घेतला. बकिंघम यांच्या मते काही कंपन्या सुरक्षेकडे ध्यान देत नाहीत, यामुळेच ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *